एस एम सेहगल फाउंडेशन कडून कीड व्यवस्थापना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन *फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)* 


कपाशी पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत  आहे,त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करायचे , तूर पिकामध्ये शेंडे खुडून तुरीचे उत्पन्न कसे वाढवता येईल याविषयी एस एम  सेहगल फाउंडेशन च्या माध्यमातून वानेगाव येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
     एस एम सेहगल फाउंडेशन च्या माध्यमातून शेती विषयक विविध उपक्रम फुलंब्री तालुक्यामधील 10 गावांमध्ये राबविण्यात येत आहेत,त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ,याचे व्यवस्थापन कसे करायचे,कोणत्या प्रकारची फवारणी करायची?कीड कशी ओळखायची? याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना त योग्य मार्गदर्शन सेहगल फाउंडेशन चे कृषितज्ञ योगेश सिंगारे यांनी केले.
यावेळी सरपंच वैशाली चोपडे, उत्तम सोटम अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, रावसाहेब सोटम, बळीराम जाधव, भास्कर जाधव, बाळू शिंदे, बि.के. जाधव, प्रवीण निकम, सुभाष शेजवळ, सुभाष सोटम, सुभाष शेजवळ, ज्ञानेश्वर चोपडे, त्रिंबक गायकवाड, शेखर जाधव, सिताराम क्षिरसागर, सुधाकर जाधव
सह प्रकल्प समन्वयक अमोल भिलंगे, गजानन मामीळवाड आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a comment

0 Comments