मराठवाड्यात ओला दुष्काळ मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार प्रशांत बंब यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रगगापुर (प्रतिनिधी 
प्रकाश सातपुते )


एकीकडे राज्यात कोरोयनाचे संकट आहे . तर दुरीकडे मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती कशी करावी,
 असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे उत्पन्न येईल, असे वाटत होते. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात तसेच मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
माझ्या मतदारसंघातील तसेच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशई आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने शेतातच मुगाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर ऊस, मका, बाजरीची पिकं आडवी झाली आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने माझ्या गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी प्रशांत बंब यांनी पत्राद्वारे केली आहे.

Post a comment

0 Comments