सिल्लोड -
आज दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी होली फेथ इंग्लिश स्कूल भराडी यांचा इयत्ता सहावी ,सातवी ,आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता शेती उपयोगी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी या संदर्भात ऑनलाईन प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये जवळपास 120 पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकवृद्धांनी सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची पाल्ये असतात. त्यांना कीटकनाशकं विषयी योग्य माहिती असायला हवी म्हणून हा परिसंवाद साधण्यात आला. सदर कार्यक्रमात सिंजेंटा इंडिया लिमिटेड पुणे यांचे श्री मंगेश पाकधाने( टेरिटरी मॅनेजर सिजेंटा) यांनी जवळ जवळ एक तास विद्यार्थी-पालकांना किटकनाशकांची सुरक्षित हातांनी व फवारणी याकरिता मार्गदर्शन केले. त्यानंतर तीस मिनिटात पर्यंत विद्यार्थी व पालक यांच्या प्रश्नांची उत्तरे तसेच शंका - निरसन करण्यात आले. डिजिटल शिक्षण प्रणाली अंतर्गत होली फेथ इंग्लिश स्कूल ऑनलाइन टिचिंग ॲप याचा वापर करण्यात आला. प्रसंगी श्री योगेश गोचके यावेळी उपस्थित होते. प्रशालेचे संस्थापक श्री. संतोष सोनवणे आणि मुख्याध्यापक श्री. समाधान सोनवणे आदी उपस्थित होते. शिक्षक विद्यार्थी व त्यांचे शेतकरी पालक या सर्वांना या परिसंवादाचा योग्य लाभ मिळाल्याच्या नोंदी पालकांनी दिल्यात.
0 Comments