आंतरराज्य टोळीतील दोघांजणांना अटक

नागपूर: बनावट एटीएम कार्डचा वापर करत पैशांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 जणांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. शहादाब खान आणि असिफ खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही संशयित आरोपी हरियाणा राज्यातील आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख 50 हजांरांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

संशयित आरोपी वेगवेगळ्या राज्यात जाऊन वेगवेगळ्या एटीएममध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून पैसे काढायचे. मात्र, त्याची बँकेकडे नोंद होत नव्हती. नागपूर शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेला एटीएममधून पैसे काढले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बॅंकेने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी एटीएमवर पाळत ठेवत दोन संशयित आरोपींना अटक केली.

Post a comment

0 Comments