धनगर समाजाचे तहसील समोर ढोल बजावो...सरकार जगावो आंदोलन


पैठण ( विजय खडसन)-

  पैठण तहसील कार्यालय येथे आज सकाळी ११  वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने ढोल नाद .आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकार धनगर समाजाच्या आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. त्यामुळे आज झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र भर ढोल बजावो....सरकार जगावो आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला देण्यात यावा व धनगर समाजाच्या न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला चांगल्या वकिलाची नेमणूक करावी. याचिका जलदगती कोर्टात चालवावी. मागील सरकारने जे आदिवासींना 1 हजार कोटींची पॅकेज दिले ते पॅकेज धनगर समाजाला त्वरित द्यावे आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ढोल नाद आंदोलन करण्यात आले. पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरज लोळगे,  चंद्रकांत झारगड, रेवणनाथ कर्डीले,विलास बापु भुमरे चंद्रशेखर सरोदे, साईनाथ सोलाट, आप्पासाहेब सोलाट, अशोक धर्मे, सुनिल विर, मिटठू नन्नावरे, साईनाथ व्होरकटे, दामोदर गांगले, जगदिश वीर, बंडू डोईफोडे, नारायण पाचे भारत धमै मधेश विर गणेश सोलाट अंकुश सोलाट शातिलाल बनसोडे कल्याण विर किशोर डोईफोडे अंबादास विर किशोर धाटे विजय धमै अविनाश कोरडे सोमनाथ तुपे रघुनाथ पंडित लक्ष्मण खुलासे भानुदास विर गणेश काळे जगदिश डोळस आदी नेते व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments