आयपीएलमध्ये 'सनरायझर्स हैदराबाद'विरुद्ध सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 'दिल्ली कॅपिटल्स'चा कर्णधार श्रेयस अय्यरला दंड ठोठावण्यात आला आहे.

  दुबई :- आयपीएल (IPL 2020) ‘सनरायझर्स हैदराबाद’कडून  पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर ‘दिल्ली कॅपिटल्स’चा  श्रेयस अय्यरला आणखी एक झटका मिळाला आहे. श्रेयसला स्लो ओव्हर-रेट कायम राखल्याबद्दल बारा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान ओव्हर रेट राखण्यासंबंधी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेयसकडून दंड आकारला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये ‘सनरायझर्स हैदराबाद’ने पहिल्यांदाच नियम मोडला. अबू धाबी येथे २९ सप्टेंबर २०२० रोजी ‘ड्रीम ११ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२०’ तील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान ‘दिल्ली कॅपिटल्स’ने स्लो ओवर रेट कायम ठेवल्याबद्दल कर्णधार श्रेयस अय्यर यांना दंड ठोठावण्यात आला आहे” असे आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत त्याच्या संघाने पहिल्यांदाच नियम मोडला. त्यामुळे श्रेयस अय्यर यांना १२ लाख रुपये दंड भरण्याचे आदेश आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments