फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)
फुलंब्री तालुक्यातील रिधोरा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद येथील कृषिदुत रोहित पालोदकर यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक ॲप्स बद्दल माहिती दिली तसेच अनेक नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देत माहिती सांगितली. तसेच पिकांचे नियोजन, एकात्मिक कीड व्यवस्थापन रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यांचा संतुलित वापर, जमिनीची सुपीकता यासह अनेक विषयांबाबत जनजागृती केली.
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये असणारे शेतमालाचे बाजारभाव, जनावरांना होणारे आजार त्यांची घ्यावयाची काळजी, लसीकरण. सेंद्रिय शेती यासोबतच शेतीसाठी लागणारे कीटकनाशके प्रामुख्याने निंबोळी अर्क (५%), दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, कंपोस्ट खत तसेच जैविक खत तयार करणे आणि वापराबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिदुतांनी गावात विविध ठिकाणी फलक लावणे की जे शेतकऱ्यांना विविध गोष्टीची माहिती देतील. यासोबतच गावातील अनेक समस्यांवर चर्चा झाली. पारंपरिक शेताबरोबरच नव्या तंत्रज्ञानावर आधारित फुल शेती, हरित गृह आणि विविध फळबागांचे नियोजन यावर मार्गदर्शन केले.
गावात गटशेती बचत गटाच्या माध्यमातून नव्या योजना कशा आणता येतील यातून गावात रोजगार निर्मिती आणि आर्थिक उत्पन्न कसे वाढवू शकतो याचेही मार्गदर्शन केले.
0 Comments