पैठण ( विजय खडसन)
१२ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचा पैठण दौरा असतांना. संत ज्ञानेश्वर उद्यान येथे पाहणी करण्यासाठी आले असता वृत्त संकलन करण्यासाठी पैठण तालुक्यातील विविध वृत्तपत्राचे व वृत्त वाहिन्यांचे तालुका प्रतिनिधी गेले असता त्यांना संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या गेटवरच सुरक्षा रक्षकांच्या मार्फत अडविण्यात आले. सुरक्षा रक्षकांना का अडवता विचारले असता त्यांनी सांगितले की, "आम्हाला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे साहेब यांचे तसे आदेश आहेत की पत्रकारांना उद्यानामध्ये प्रवेश देऊ नये."
तद नंतर श्री राजेंद्र काळे यांना फोन वरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की "मा. तहसीलदार साहेब चंद्रकांत शेळके यांनी पत्रकारांना प्रवेश देऊ नये असे आदेश दिले आहेत" असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर विविध वृत्तपत्राचे व वृत्त वाहिन्यांचे पत्रकार यांनी वृत्त संकलन न करण्याचे एकमताने ठरवले व उद्यानात समोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला. मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन देऊन त्याची प्रत मा. ना.उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात सदरील घटनेमुळे पत्रकारांच्या वृत्त संकलन करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले असल्याचे व प्रशासनातर्फे मुस्कटबाजी करण्यात आले असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रमेश लिंबोरे तर पैठण तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नानक वेदी यांच्या सह वरीष्ठ पत्रकार संजय जाधव, चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, चंद्रकांत अंबिलवादे, मुफीद पठाण, मोहन ठाकूर, विजय खडसन, दादासाहेब गलांडे, गौतम बनकर, चंदन लक्कडहार, सुरेश वायभट, बाबा अडसूळ, सोमनाथ शिंदे, दादा घोडके, शिवाजी गाडे, राहुल पगारे, मंगलसिंग भवरे,मनोज परदेशी, ज्ञानेश्वर बावणे, प्रेस फोटोग्राफर बाळासाहेब आहेर आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
0 Comments