केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा मागणीसाठी कायगाव येथे रस्ता रोको आंदोलन गंगापूर (प्रकाश सातपुते) 

केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी कायगाव येथे रस्ता रोको आंदोलन करून प्रधानमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन  देण्यात आले आहे. 
निर्यात बंदी च्या घोषणेनंतर मिळणाऱ्या दरात जो नुकसानीचा फरक असेल त्या फरकाचा मोबदला केंद्राने शेतकऱ्यांना द्यावा सुशांत राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत आदी प्रश्नांची भाजपने रान उठवले. त्यातून विशेष काही हाती न लागल्याने कांद्याच्या निर्यात बंदीचा प्रश्न निर्माण करण्यात आला केंद्र सरकारने विदेश व्यापार कायदा 1992 अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपयापासून ते 2 हजार 500 रुपये पर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात 75 टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातून कांदा निर्यात होतो त्यापैकी 80 टक्के कांदा हा राज्यातील शेतकरी बांधवांचा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मिळालेल्या उत्पन्नांतून आता कुठे चांगले पैसे शेतकऱ्यांच्या खिशात पडत असताना देशातील सर्वात मोठा शेतकरी वर्ग असल्याने  केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घोषित केला. कांद्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांनी गडगडले. हा निर्णय हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर केंद्र सरकार चा घाला आहे.
अंबानीला 'राफेल'चे कॉन्ट्रॅक्ट देता,अदानीला 'विमानतळा'चे काँट्रॅक्ट देता..कंगनाला गरज नसताना 'सुरक्षा' देता.आणि शेतकऱ्यांच्या मालावर 'निर्यातबंदी' आणता.भीक नको घेऊ घामाचे दाम हे ब्रीद वाक्य घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन निवेदन तहसीलदार अविनाश शिंगटे यांना देण्यात आले यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके,शिवसेना नेते कृष्णा पाटील डोनगावकर,माजी सरपंच बाबासाहेब चव्हाण,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे,गजानन धबडगे , राहुल लांडे, सुरेश चव्हाण,राहुल चव्हाण,राधकीसन औटे,सुनील बोराटे, विलास पानसरे,गोकुळ नागे, राजू भाई शेख,नाना म्हसरूप,रामदास वाघ,लक्ष्मण जाधव,रमेश चव्हाण,महेश चव्हाण,शिवाजी लांडे,कांतीलाल चव्हाण,कृष्णा चव्हाण,रामकीसन चव्हाण, दादा चव्हाण,चंदू टाके,सिधू अमृते, दत्तू लांडे,काकासाहेब टाके,बाबासाहेब सुखधान,आदी ऊपस्थीत होते

Post a comment

0 Comments