शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु -गोपीचंद पडळकर

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाज बांधवानी आरक्षणासाठी  आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे.
इकडे सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये धनगर बांधव ढोल वादन करत मोर्चा काढत आहेत.


Post a comment

0 Comments