श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष पदी जितेंद्र सातनाक यांची निवड(श्रीवर्धन रामचंद्र घोडमोडे  दि.२५ )
श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष पद प्रभारी  नगराध्यक्ष म्हणून जितेंद्र सातानाक यांच्या कडे होते. नगरपरिषदेला कायम नगराध्यक्ष देण्याची मागणी जनतेकडून केली जात होती. तांत्रिक कारणामुळे भुसाणे यांचे नगराध्यक्ष पद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्याने बुधवारी दि.२३ रोजी  नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरण्याची मुदत होती. राष्टवादी,काँग्रेस, शेकाप आघाडी च्या वतीने जितेंद्र सातनाक  तसेच शिवसेना बाजूने अनंत गुरव यानी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दि २५ रोजी नगरपरिषदमध्ये नगरसेवकांची इच्छुक उमेदवाराला हात वर करून घेण्यात आलेल्या  मतदानात जितेंद्र सातनाक यांना १२ मते तर शिवसेना उमेदवार अनंत गुरव याना ५ मते पडली. पिठासीन अधिकारी सचिन गोसावी यांनी नगराध्यक्ष पदी जितेंद्र सातनाक हे सात मतांनी विजय होऊन यांची निवड नगराध्यक्ष पदी झाल्याचे घोषित केले. या निवडणुकीसाठी आमदार अनिकेत तटकरे यांची खास उपस्थिती होती .खासदार सुनील तटकरे साहेब यानीही फोन वरून नवनिर्वाचित नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक याना शुभेच्छा दिल्या .सातनाक यांचा शहरात मोठा चाहता वर्ग असून प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या काळात मदतीचा हात पाठीशी असतो. त्यांनी नगरपालिका उपनगराध्यक्ष पदी अनेक वर्ष काम पाहिले आहे. विरोधकांना ही आपलेसे करून शहराचा विकास करण्यात मोठा वाटा आहे. सोमजाई देवी ट्रस्ट अध्यक्ष,संघर्ष ग्रुप अध्यक्ष  व  र ना.राऊत शिक्षण सभापती असे अनेक  पदे भूषवत आहेत .लोकांची कामे करण्याचा दांडगा अनुभव आहे. यामुळे शहरात असंख्य युवा वर्ग त्याच्या प्रत्येक कामामध्ये पाठीशी उभा असतो. नगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळतांच त्यांच्यावर श्रीवर्धन वासीयानं कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी बोलताना श्रीवर्धन मधील विकासकामांसाठी विकासाचे माहमेरु खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्फत पाठपुरावा करून रखडलेली  कामे मार्गी लावणार असल्याचे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी सांगितले. 

Post a comment

0 Comments