मराठा आरक्षण स्थगिती विरोधात मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा


रायगड, माणगाव

आज दिनांक २०/०९/२०२०सर्व प्रमुख मराठा समन्वयकांच्या उपस्थितीत सकल मराठा समाज, दक्षिण रायगड क्षत्रिय मराठा भवन माणगाव येथे सभा संपन्न झाली.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीविरोधात पुढील वाटचालीसाठी दक्षिण रायगड येथील समाजबांधव आणि समन्वयकांची भुमिका स्पष्ट करण्यासाठी आजची हि सभा आयोजित करण्यात आली.
सदर सभेत सर्व समाजबांधवांनी आपल्या भुमिका मांडून पुढील आंदोलनाची दिशा काय असावी याबद्दल  बहुमुल्य विचार मांडले.
        सर्वांच्या एकमताने आंदोलनाची भूमिका ठरविण्यात आली व त्याप्रमाणे दक्षिण रायगड मधील सर्व सातही तालुक्यांमध्ये (माणगाव,महाड, पोलादपूर,तळा,म्हसळा, श्रीवर्धन व रोहा ) दि.२५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सनदशीर मार्गाने प्रांताधिकारी कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन करुन *प्रांताधिकारी यांना निवेदन देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
त्याचबरोबर रविवार दि.२७ सप्टेंबर २०२० रोजी रायगड जिल्हा पालकमंत्री आदितीताई तटकरे,आमदार श्री.भरतशेठ गोगावले व मान.खासदार श्री.सुनिलजी तटकरे साहेब यांना सकल मराठा समाज,दक्षिण रायगड यांचेतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.
शुक्रवार दि.२५ सप्टेंबर २०२० चे ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि कोविड-१९ च्या नियमांना बांधिल राहून यशस्वी करण्यासाठी आजपासूनच आपआपल्या तालुक्यांमध्ये नियोजन करण्याचे ठरविले. 

सदर सभेचे आयोजन क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय मराठा युवा मंच माणगाव -तळा यांनी केले होते.
रिजवान मुकादम सह मराठा तेज ब्युरो माणगाव, रायगड

Post a comment

0 Comments