कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या! – अनंत हुमणे


पुणे
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वादाने राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. विरोधी पक्ष आणि  सत्ताधारी पक्ष स्वतःची भूमिका स्पष्ट करताना  एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. हिंदी भाषिक मिडियामधील काही पत्रकार या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र सहा महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, उपासमारीवर आलेला शेतकरी, भवितव्य अंधारात असलेले विद्यार्थी यांच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. अशी टीका करत शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत हुमणे यांनी शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आरोग्याचे प्रश्न महत्वाचे आहेत, असे अधोरेखीत केले आहे. कंगना प्रकरण संपलं असेल तर आता वाढलेले लाईट बिल तसेच शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, आरोग्याचे व सामान्य नागरिकांचे असे अनेक प्रश्न राज्यासमोर आहेत.
सामान्य नागरिकांना नोकरी निमित्त कामावर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसची वाट पहात दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत असून कुठलेही सोशल डिस्टनसिंग पाळले जाण्याची शक्यता कमी  असते. सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवास बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांनी लवकर सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मागील सहा महीन्यांपासून नागरिक  सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करुन सरकारला साथ देत आहे. परंतु आता जीवन जगणे खुप कठीण झालेले आहे. तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपसातले मतभेद बाजूला ठेवून नागरिकांना भेडसावत असलेल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे!

Post a comment

0 Comments