'हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही लावला नाही.'


हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला

चंद्रपूर : चोरी केली, पण पैैैशाला हात लावला नाही.  असा    असा प्रकार चंद्रपुरात बघायला मिळाला आहे. सचिन हॉटेलमधील ह्या प्रकाराने संचारबंदीतील वास्तव पुढे आणले आहे. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, केवळ पोटभर जेवून, खिशात पदार्थ भरुन नेले. त्याने गल्ला उघडून रक्कम मोजून जागेवर ठेवली. त्याची प्रामाणिकता पाहून हॉटेलचालकाने देखील पोलीस तक्रार टाळली. कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे हाल झाले, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला.

Post a comment

0 Comments