राज्य मंत्री अब्दुल सत्तार द्वारा महामार्ग पोलीसांच्या अत्याधुनिक इंटर्सेप्टर कारची पाहणी...


औरंगाबाद  : राज्य मंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्हा दौरयावर कन्नड येथे जात असताना रस्त्यावर थांबून महामार्ग पोलिसांच्या अत्याधुनिक कारची पाहणी केली.  महामार्ग पोलीस  खुलताबाद सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, पोलिस हेड काॅन्सटेबल अमर आळंजकर, अभिजित गायकवाड, बापूराव चव्हाण यांनी महामार्गावरील अपघात कमी होण्याकरिता पुरविण्यात आलेल्या इंटर्सेप्टर कार बाबतीत सविस्तर  माहिती दिली. तसेच महामार्गावरील अपघाताचे प्रमाण जनजागृती करून कशाप्रकारे कमी होतील याबाबत याबाबत त्यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमे संदर्भात सविस्तर माहिती दिली.

सदर माहिती समजावून घेऊन राज्य मंत्र्यांनी सदर उपक्रमा संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलाचे कौतुक केले. 

सदर वेळी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, कन्नड मतदार संघाचे आमदार   उदयसिंग राजपूत, कन्नड महसूल विभागाचे अधिकारी तसेच विविध पक्षाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते हजर होते.

सदर जनजागृती माननीय अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई  भूषण कुमार उपाध्याय , पोलीस अधीक्षक मुख्यालय मुंबई विजय पाटील व पोलीस अधीक्षक पुणे विभाग पुणे प्रीतम यावलकर,  औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, महामार्ग पोलिस  निरीक्षक नंदिनी चानपूरकर 
यांच्या  मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत  आहे.

Post a comment

0 Comments