गाजगाव येथे बिबट्या आला भयभीत झाले परंतु तडसाच्या पायाचे ठसे आढळले,गंगापूर ( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

गंगापुर तालुक्यातील गाजगाव परिसरातील   बिबट्या प्रमाणात तडस आढळल्याने नागरिक भयभीत झाले परिसरात  शेतकरी व शेतात असलेल्या लोकांना भीतीचे वातावरण बनले असून दुपारी शेतात काम करत असलेल्या महिला यांना त्याप्रमाणे तडस हा दिसला व भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले असता शिल्लेगाव पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशाने पोलीसांच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली व वन विभागाच्या अधिकाऱ्याला गटनास्थळी बोलवले असता आधिकार्यानी परिसरात पाहणी करून शेतकऱ्यांना व महिलांना विचारपूस करून या प्राण्याची ओळख पटवून पायाचे ठसे यावरून तडसाच्या पायाचे ठसे आढळून आले असे वनविभागाचे अधिकारी कविता राऊत यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले व ग्रामस्थांनी परिसरात घाबरून जाऊ नये गंगापूर तालुक्याच्या कुठल्याही परिसरात बिबट्याची दहशत नाही काही प्रमाणात तडस प्राणी आहे तरी त्याला घाबरून जावून नाही हा प्राणी माणसाच्या शरीरावर हानी करत नाही तर घनदाट अरण्याच्या परिसरात वावरायचे असेल तर सोबत कुठलातरी आवाज किलबिलाट करत राहावे असे वन पर्यवेक्षक कविता राऊत यांनी घटना स्थळीसमजावून सांगितले यावेळी  गावचे पोलीस पाटील सुरेश संगेकर, ग्रामस्थ पोपट कळवणे, नंदू कळवणे,यांच्या सह वन अधिकारी यांनी गावातील नागरिकांना बिबट्या नसून तडस असल्याचे सांगितले आहे.

Post a comment

0 Comments