दारु खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने वाईन शॉप चालकावर हल्ला

कल्याण : दारु खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने वाईन शॉप चालक आणि दोन मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. अवघ्या पाचशे रुपयाच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर येत आहे. सध्या पोलीस या सीसीटीव्हीच्या माध्यामातून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे. गोविंद प्रेमप्रकाश वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर या ठिकाणी राहणारा आहे. 

टिटवाळ्याती म्हारळ परिसरात एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपवर सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती दारू खरेदी करण्यासाठी आला. त्याने दारु खरेदी केली आणि ५०० रुपये दिले असल्याचे सांगितले. मात्र दारुचे पैसे मला मिळालेच नाही, असे शॉप चालकाने त्याला सांगितले. यावरुन शॉप चालक धर्मपाल सिंग आणि त्या ग्राहकामध्ये वाद झाला. त्यानंतर तो ग्राहक घरी निघून गेला.

Post a comment

0 Comments