ग्राम निधीचा वापर योग्य रीतीने करा गट विकास अधिकारी परदेशी यांचे आवाहन


गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

ग्रामनिधीचे ,गावाच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक विचाराने कामकाज करून निधीचा विनीयोग करावा.कुठलीही अडचण येणार नाही आल्यास मी सदैव  मार्गदर्शन करील  असे आवाहन गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी केले
   गंगापूर तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून  निवड झालेल्या केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक यांची बैठक  पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी गटविकास अधिकारी परदेशी बोलत होते
   ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजा बाबतीत प्रशासक यांना कोणताही अडचण निर्माण झाल्यास याचे निवारण करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी  विजय परदेशी यांनी सांगितले
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती यांचे पती सुनिल केरे , गटशिक्षणाधिकारी  अनिलकुमार सकदेव , वरिष्ठ लिपिक रवि जोशी ,दादासाहेब कापसे , शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुनिल जाधव , शालेय पोषण आहार अधिक्षक प्रविण कोल्हे , केंद्र प्रमुख अंकुश जाधव , अनिल वाहूरवाघ , दादासाहेब पाचपुते , दत्तात्रय घोगरे , प्रकाश सोनार,  विजय तुपे , लक्ष्मण उबाळे, विलास जाधव आदीसह केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक आदींनी उपस्थिती होती

Post a comment

0 Comments