अतिवृष्टीने अनेक हेक्टरवरील पिके भुईसपाटअतिवृष्टीने शेतकऱ्याच्या नशीब पुन्हा आर्थिक आणीबाणी


गंगापुर ( प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 

माजी खासदार श्री खैरे यांनी भिवधानोरा, अगरवाडगाव,धनगरपट्टी या परिसरात पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी केली.दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कापूस,तूर,बाजरी,ऊस आदी शेती पिकांची अतोनात नुकसान  झाल्याचे आढळून आले आहे. या विषयी खैरे यांनी हळहळ व्यक्त करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या
पिकांचे तत्काळ पंचनामा करण्याच्या सुचना तहसीलदार अविनाश शिंगटे,तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांना केली.त्यावेळी त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अविनाश पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप निरपळ,युवासेना जिल्हा प्रमुख मचिंद्र देवकर,तालुका प्रमुख दिनेश मुथा,गंगापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती पोपटराव गाडेकर उपस्थित होते. 
माजी खासदार श्री खैरे यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना कापूस,सोयाबीन पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याची नोंद घ्यावी व इतर शेती मालाचे ही पीक निहाय सरसगट पंचनामे करण्याचे सूचित केले.
याप्रसंगी गंगापूर साखर कारखाण्याचे माजी संचालक नानासाहेब वाघ,भाऊसाहेब वाघ,सरपंच भाऊसाहेब नवरंगे, माजी सरपंच काकासाहेब म्हसरूप पत्रकार जमील पठाण तलाठी श्रीराम जोशी,कृषी मंडळ अधिकारी विष्णू मोरे,प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, माजी सरपंच राधाकिसन औटे,उपसरपंच अशोक म्हसरूप,गणेश चव्हाण,परसराम औटे,अशोक चव्हाण,माजी उपसरपंच गोकूळ तांगडे, केदार चव्हाण, विठ्ठल वाघ, गणेश खैरे, राजेंद्र चव्हाण,आखतर पठाण,राजूभाई पठाण,राजेश मिसाळ,पांडुरंग वाघ यांच्यासह आदी शेतकरी हजर होते.

Post a comment

0 Comments