महराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षानी आणि महाराष्ट्रातील जनतेने आता मुंबई -पुणे शहरांकडे कड़े लक्ष देणे गरजेचे आहे - अनंत हुमणे    पुणे         महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी एकत्र मिळून कोरोना सारख्या घातक विषाणू विरुद्ध लढायला पाहिजे. पण सध्या तसे न होता प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या पक्षाचा झेंडा मिरवत आहे. जे राजकीय पक्ष सत्तेत नाहीत ते कोणताही अर्थहीन मुद्दा घेऊन राजकीय प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सामान्य माणसांच्या मनामध्ये तेढ निर्माण करण्याची भूमिका घेतली जात आहे. कधी राजकीय तर कधी सिनेमासारख्या क्षेत्रातील मुद्दा घेऊन एकमेकांवर टिका केली जात आहे.
आपण महाराष्ट्र राज्यात  राहतोय. कोरोना विषाणूच्या महाभयंकर प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन घोषित केले. अनेक नागरिकांना नोकरी-व्यवसायापासून वंचित रहावे लागले आहे. कित्येक लोकांचे मृत्यु झाले आणि अद्यापही होत आहेत. हे सर्व कसे थांबेल ह्या करीता  सर्व राजकीय  पक्षानी एकत्र येवून योग्य निर्णय घेऊन एकमेकांना साथ दिली पाहिजे.  
परंतु, तसे चित्र दिसून येत नाही. जगावर कोरोना सारखा जीवघेणा विषाणू घोंघावत आहे. त्यातून आपला देश लवकरात लवकर कोरोना मुक्त कसा होईल, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपसातले मतभेद बाजुला ठेवून एका विचाराने एकत्र येणे ही काळाची गरज आहे.असे रोक ठोक मत शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत हुमणे यांनी व्यक्त केले.

Post a comment

0 Comments