तलाठ्याने केले अपंग व भुमिहिन लोकांना निराधार ; निलबंनाची कार्यवाही करावी -. नितिन भिसे.

*
 
पैठण प्रतिनिधी :—  विजय खडसन

  पैठण तालुक्यातील ,टाकळी अंबड, येथिल जावेद शरफुद्दीन शेख  मौजे घेवरी ,पो.टाकळी अंबड ,ता.पैठण  येथिल रहिवाशी असुन ते  55 %  टक्के अपंग आहे .ते अपंग असल्याने त्यांना कोणताही कामधंदा होत नाही .तो संपुर्णपणे  निराधार आहे. 
त्यांनी तलाटी सजा टाकळी अंबड ता. पैठण जि. औरंगाबाद यांचे कडून संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ मिळणेसाठी प्रस्ताव सादर करणेसाठी कागदपञांची मागणी केली.
ते स्वत:  भुमिहीन आहे.त्यांचे वडिलांचे नावे जमीन असुन ती त्यांच्या ताब्यात व वहितीत असुन त्या जमिनीशी माझां काही एक संबध नाही. तसेच मुस्लिम कायद्दाने वडिलांच्या संपतीत मुलांचा हक्क हितसंबध नसतो .वडिल त्यांच्या मर्जीने व स्वखुशीने विल्हेवाट लावु शकतात. त्यात मुलांना वडिल जिवत असतांना हक्क मागण्याचा हक्कचं नाही.
असे असतांना ते अपंग असल्याने शेत जमिन वहिती मेहनत मशागत सुध्दा करु शकत नाही असे असतांना तलाटी सजा टाकळी अंबड यांनी त्यांना भुमिहीन व अपंग असल्याचे प्रमाणपञ न देता चौकशी अहवालावर गट.नं.  404  पैकी  00  हे. 50 आर. जमीन त्याचे एकट्याचे नावाने दाखवली आहे.
जी जमीन त्याच्या नावावर नसतांना त्यांनी ती त्यांचे मालकीची दाखवुन अपंगावर टाकळी अंबडचे तलाटी हे मुद्दामहुन नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ देतांना टाळाटाळ करतात लाभार्थ्याची अडवणुक करतात. तसेच लाभार्थ्याकडून पैश्याची मागणी करतात.तलाटी यांनी गडगंज संपती जमा केली आहे . त्यानी नोकरीवर असतांना त्यांना ज्ञात स्ञोता पेक्षा जास्तीची संपती जमा केलेली आहे. औरंगाबाद येथे त्यांनी मोठा  3 कोटी रुपये किंमतीचा बंगला बांधलेला आहे . तसेच इतर ठिकाणी देखील जमीन जुमला त्यांनी त्यांच्या नातेवाईक व मिञ परिवाराच्या नावाने घेतलेली असावी त्याचीही चौकशी करण्यात यावी.
तरी वरील प्रकरणाची चौकशी करण्यात येवुन त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच त्यांनी अवैध मार्गाने नोकरीवर असतांना कमावलेली अवैध संपतीची चौकशी करुन ती शासना मार्फत जप्त करण्यात यावे व त्यांना नोकरीवरुन बडतर्फ करण्यात यावे ही विनती .जर त्यांची चौकशी न झाल्यास  मा. जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषणास बसेल असे नितिन भिसे यानी निवेदनात म्हटले आहे

Post a comment

0 Comments