एका पस्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुण आत्महत्या

सिल्लोड,  एका पस्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुण आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 27) दुपारी 1 वाजेच्या सुमारास तालुक्यातील केळगाव येथे घडली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.  

       विजय रामदास गायकवाड (35) रा. केळगाव असे विष प्राशन करुण आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

    मयत शेतकऱ्याने रविवारी विष प्राशन केल्याने त्यांना तत्काळ सिल्लोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती खालवल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. 

      

Post a comment

0 Comments