रस्त्यांसाठी सर्वांनी मिळुन ५०० कोटी आणण्यासाठी प्रयत्न करावे - मा.महापौर नंदकुमार घोडेले.


औरंगाबाद - शहरातील रस्त्यांच्या कामासाठी सर्व आमदार,खासदार, लोकप्रतिनिधी व आयुक्त तथा प्रशासकांनी मिळुन केंद्र व राज्य शासनाकडून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने सर्व सदस्यांकरिता आज ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस बोलताना माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विविध विषयांवर आपल्या सूचना मांडल्या. 
या बैठकीत सर्व सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा आगामी बोर्ड मीटिंग मध्ये निश्चितच चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिले.

Post a comment

0 Comments