खंडाळा येथील तरुणाने केले पाच हजार परतवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

खंडाळा येथील तरुणाने केले मिळालेले पाच हजार परत. कपडे प्रेस करत असताना मिळून आलेले पाच हजार रुपये आज दि.29 सप्टेंबर रोजी परत केले.त्यामुळे तरुणाचा प्रामाणिक पणा  समोर आला आहे.सोमवारी दि.28 रोजी  पानगव्हान येथील किशोर घायवट यांचे कपडे प्रेस करायला आले होते , त्यात त्यात वडिलांना प्रेस करताना पाच हजार रुपये मिळून आले म्हणून त्यांनी प्रेस करताना ते बाजुला काढून ठेवले. त्या नंतर सदरील व्यक्ती आपले कपडे प्रेस करून घेऊन गेली पण सदरील व्यक्तीच्या हे लक्षातच नव्हते संत गाडगेबाबा लॉन्ड्री चे मालक सचिन देसाई यांनी स्वतः कॉल करून करून सदरील व्यक्तीस बोलवून पैसे परत केले.यामुळे सचिन देसाई यांच्या प्रामाणिक पणाचे खंडाळा परिसरात कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments