राज्यातील सर्व पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. गेल्या २० एप्रिल ते २६ सप्टेंबर या काळात मास्क न घालणाऱ्या १४ हजार २३४ मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल ५२लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.यापूर्वी मुंबईत मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. मात्र आता मुंबई महापालिकेने १० सप्टेंबरपासून हा दंड कमी करुन २०० रुपयांवर आणला आहे.यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेच्या वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना २००रुपये दंडातील १० टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments