राजेगावच्या युवा शेतकऱ्याच्या घरात आणला मिरचीने गोडवा...कोराना काळात मिरचीचेएक एकरात तीन ते चार लाखाचे उत्पन्न..


निलेश जांबले दौंड-पुणे
राजेगाव (ता. दौंड) येथील युवा शेतकरी अतुल बापूराव खरात यांनी एक एकर क्षेत्रामध्ये घेतलेल्या सितारा गोल्ड मिरचीचे भरघोस उत्पन्न मिळत असून शेवटपर्यंत तीन ते चार लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.              
    खरात यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ४ जून रोजी सितारा गोल्ड मिरचीच्या रोपांची मल्चिंग बेड करून लागवड केली होती. सदर रोपे उरुळी कांचन इथून एका खाजगी नर्सरी मधुन खरेदी केली आहेत.सर्व साधारणपणे दीड ते दोन महिन्यातच म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात  मिरचीचा पहिला तोडा सुरू झाला.
सुरुवातीला मिरचीला साधारणपणे प्रति किलोला 18 ते 22 रुपयांपर्यंत भाव मिळत होता. आता तो प्रति किलो 35 रुपये एवढा बाजार मिळत आहे. आठवड्यातून दोनदा मिरचीचा तोडा केला जात असून आठवड्याला जवळपास विक्रमी पंधराशे किलो  मिरचीचे उत्पादन मिळत आहे. सदर मिरचीची विक्री पुणे येथील मार्केटयार्ड येथे केली जात आहे.आत्तापर्यंत मिरची विक्रीतून जवळपास सव्वा लाखाचे उत्पन्न झाले असून आणखी दोन ते अडीच  लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.
मिरची तोडणी सुरू झाल्यापासून सहा महिनेपर्यंत मिरचीचा तोडा चालू असतो.सदर उत्पन्नासाठी खरात यांना एकूण 50 ते 60 हजार रुपये खर्च आलेला आहे.
यामध्ये ड्रीपसाठी दहा हजार रुपये
मल्चिंगसाठी दहा हजार रुपये
रासायनिक खतांसाठी सात ते आठ हजार रुपये शेणखतासाठी सात हजार रुपयेऔषध फवारणीसाठी दहा हजार रुपये रोपे खरेदीसाठी चार ते पाच हजार रुपये आणि मजुरीसाठी पंधरा हजार रुपये
यावेळी खरात म्हणाले की, या कामासाठी घरातील माझ्यासह आई-वडील ,भाऊ, पत्नी आणि भावजय सगळेच कष्ट घेत असून  मिरची तोडण्यासाठी मात्र बाहेरील मजुरांची मदत घ्यावी लागते. सदर यशस्वी प्रयोगासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत वैभव घालमे यांनी मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या काळामध्ये शेतीमालाला पडलेल्या बाजारभावामुळे बळीराजाला नैराश्य आलेले असताना युवा शेतकरी अतुल खरात यांनी आपल्या शेतीत मिळवलेल्या भरघोस उत्पन्नामुळे बळीराजाला एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments