पैठण औरंगाबाद रोडवरती खड्डेमय रस्ता ठरु शकतो मृत्यूचा सापळा , किती आपघाताची वाट बघत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग.


पैठण( प्रतिनिधी विजय खडसन)--
पैठण औरंगाबाद रस्तांयावर मोठ्या प्रमाणात खडे झाल्यामुळे
पैठण रस्ता हा अनेकवेळा अपघातास कारणीभूत ठरून अनेकजणांच्या मृत्युचेही कारण ठरले आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार पैठण औरंगाबाद रोड वरती  घडताना दिसत आहेत. गेली पंधरा दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे ढोरकिन ते पैठण  रस्त्यांची सध्या  स्थितीला झालेली दयनिय अवस्था बघून  हे खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे चित्र ढोरकिन ते पैठण  रस्त्यावर पहावयास मिळते.


पैठण औरंगाबाद  रहदारीचे मुख्य रस्ते सध्या दयनीय अवस्थेत असून ठिक ठिकाणी रखडलेले व खडेमय रस्ते येथून रहदारी करताना वाहनचालकांच्या आणि नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. ढोरकिन ते पैठण हे  खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. या रस्त्यांचा अक्षरशः चाळण झाली आहे. वाहना चालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या खड्डयांत दुचाकी आदळून अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत. तसेच या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी नागरिक पायी प्रवास करत असतात वाहने खड्ड्यात आदळली की त्यातील पाणी त्यांच्या अंगावर उडण्याच्या घटना देखील घडत आहेत. 


पैठण औरंगाबाद चौपदरीकरण  रस्त्याचे घोडे अजून किती दिवस अडून राहणार आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा याबाबत पत्रव्यवहार करूनही निष्क्रिय प्रशासकीय व्यवस्थेमुळे परिस्थिती तशीच आहे. यामुळे  येथील वाहनचालक आणि नागरिकाना या रस्त्यांवरून रहदारी करताना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच हे प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सूर  नागरिकांतून  निघत आहे.

Post a comment

0 Comments