सोयगाव मधील विकास कामांचा अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ     सोयगाव,दि.२७ (  प्रतिनिधी ) :- राज्यमंत्री  अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यात ग्रामविकास विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी पहिल्या टप्प्यात जवळपास १० कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करून आणली. त्यामुळे सोयगावच्या ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या मंजूर कामांपैकी तालुक्यातील कंकराळा, माळेगाव पिंपरी ,जरंडी, निंबायती गाव, निंबायती तांडा , रामपूर तांडा, न्हावी तांडा,  बहुलखेडा, कवली, तिखी, गलवाडा ,वेताळवाडी , जंगला तांडा, फर्दापुर तांडा ,वरखेडी बुद्रुक, पळसखेडा या गावांमध्ये विविध विकास कामांचा तसेच ''माझे कुटुंब माझे जबाबदारी'' या मोहिमेचा शुभारंभ यासोबतच नांदगाव तांडा व बोरमाळ तांडा येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले .

    यावेळी त्यांच्यासमवेत आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, विधानसभा प्रमुख दिलीप मचे, जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती मोनाली राठोड, डॉ. अस्मिता पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे,जि.प. सदस्य गोपी जाधव, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे,पंचायत समिती सभापती रुस्तुलबी उस्मान खाँ पठाण , उपनगराध्यक्षा मंगलाबाई राऊत, पंचायत समिती सदस्य धरमसिंग चव्हाण, निजाम पठाण, आर.एस.पवार,शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन,संजय मुटकुटे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, कंकराळा सरपंच, चंदाबाई राजपूत, माळेगाव सरपंच दादाराव जाधव, बहुलखेडा सरपंच राजमल पवार, बनोटी वाडी सरपंच नितीन बोरसे, जामटी सरपंच राधेश्याम जाधव,
 भिका अप्पा,डॉ.फुसे, आंनदा ढगे, संदीप मिसाळ, गणेश कापरे, राजेंद्र गव्हाड ,दत्तू इंगळे, अनिल इंगळे, जीवन पाटील, भारत तायडे, हर्षल देशमुख, फेरोज पठाण, महम्मा पठाण, बाबू चव्हाण, श्रावण चव्हाण, मुरली चव्हाण, वसंत राठोड, हिरा चव्हाण, सांडू बनसोडे वरखेडी तांडा- श्रावण जाधव, संतोष राठोड, परसराम राठोड ,महेबूब पठाण, शफीक पठाण, नामदेव सोने, मनोज शेवगव, रवि शेवगण, पांडू तडवी आदींची उपस्थिती होती.

     यावेळी ना.अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगावच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निधी कमी पडणार नाही. चाळीसगाव पर्यंत करण्यात येत असलेल्या चौपदरी रस्ता हा सोयगाव हुन औरंगाबाद -  जळगाव रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्ताव तयार असून लवकरच त्याला मंजुरी दिली जाईल. तसेच तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी व वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाला कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे अब्दुल सत्तार म्हणाले ,
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानात सहभागी होऊन आपला तालुका कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करावा असे आवाहन देखील ना.अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आलेले विविध विकास कामे

कंकराळा येथे स्मशानभूमी शेड व सुशोभिकरण करणे ५ लक्ष , माळेगाव पिंपरी येथे स्मशानभूमी शेड व सुशोभिकरण करणे ५ लक्ष, जरंडी येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष ,जरंडी येथे शांताबाई यांच्या घरापासून ते शेख पाशु यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १० लक्ष , जरंडी येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष , जरंडी येथे सामाजिक सभागृह बांधणे १५ लक्ष ,जरंडी येथे रामा २४ ते जोड रस्ता जरंडी बांधकाम करणे २५ लक्ष, निंबायती गाव येथे मस्तान मुनिर  यांच्या घरापासून ते दिलावर तडवी यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १० लक्ष , निंबायती गाव येथे गावांतर्गत पेवर ब्लॉक बसविणे १५ लक्ष, निंबायती तांडा येथे गावांतर्गत सिमेंट रस्‍ता करणे ७ लक्ष, रामपूरा तांडा येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे ५ लक्ष, न्हावी तांडा येथे  गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष, बहुलखेडा येथे नवीन स्मशानभूमी शेड बांधणे ५ लक्ष , बहुलखेडा येथे जिल्हा परिषद शाळे पासून कब्रस्तान पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष, बहुलखेडा येथे रामा २४ ते पिंपळगाव हरेश्वर रस्ता करणे ३० लक्ष , कवली येथे स्मशानभूमी शेड व सुशोभिकरण करणे ७ लक्ष , कवली येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष, कवली येथे रामा २४ ते कवली , पिंपळगाव जिल्हा हद्द पर्यंत रस्ता पूल दुरुस्ती करणे २५ लक्ष, तिखी येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे १० लक्ष, तिखी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, तिखी येथे रामा २४ ते जोडरस्ता २० लक्ष, आमखेडा येथे छत्रपती शिवाजी नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १० लक्ष , आमखेडा येथे समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष , आमखेडा येथे रामा २४ ते आमखेडा रस्त्याची सुधारणा करणे ५० लक्ष , गलवाडा येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष,  गलवाडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, वेताळवाडी येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष, वेताळवाडी येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष, जंगला तांडा येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १० लक्ष , जंगला तांडा येथे रामदेव बाबा मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, 
जंगला तांडा येथे स्मशानभूमीचे शेड व सुशोभिकरण करणे ५ लक्ष, फर्दापूर तांडा येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे ५ लक्ष, फर्दापूर तांडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, फर्दापूर रामा २४ फर्दापूर तांडा ते वरखेडी तांडा फाटा ते जिल्हा सरहद्द रस्त्याची सुधारणा करणे ६० लक्ष, वरखेड बुद्रुक येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १५ लक्ष, वरखेडी बुद्रुक येथे सामाजिक सभाग्रह बांधकाम करणे १५ लक्ष, धनवट येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष, धनवट येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष , पळसखेडा येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे १० लक्ष पळसखेडा येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष असे जवळपास ६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला.

Post a comment

0 Comments