नांदर दावरवाडी येथे बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये भिती

पैठण ( विजय खडसन)

 पैठण तालुक्यातील  नांदर  येथे पुन्हा ऐकदा ऐन शेतीच्या कामात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून,नांदर येथील शेतकरी आप्पासाहेब गवारे यांची गावापासून जवळपास ऐक किलो मिटरच्या अंतरावर शेती असून शेतातील मळ्यात गट न.३८९ मधील गोठ्यात बांधुन ठेवलेल्या वासरावर बुधवारच्या रात्री बिबट्याने हल्ला केला.यात बिबट्याने वासराचे पोट फाडुन वासराला ठार केले.
बुधवारी सकाळी शेतकरी अप्पासाहेब गवारे हे मळ्यात गेले तेव्हा त्यांना वासरु मृत अवस्थेत व पोट फाटलेल्या अवस्थेत दिसुन आले.पाऊसाने ओलावा आसल्याने मयत वासरा शेजारी बिबट्याच्या पायांचे मोठाले ठसे आढळून आले.
लगेच त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नांदर येथील घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहनी करून पंचनामा केला.व आजुबाजुच्या शेतातील परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या सापडला नाही.आता बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या वतीने घटनास्थळाच्या परिसरात कॅमेरे बसविण्यात आले आहेत.ते कॅमेरे गुरवारी तपासण्यात येणार आहेत.
बिबट्याच्या दहशतीने नांदर सह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे पैठण हे तालुका वनपरिमंडळ अधिकारी मनोज कांबळे,वनरक्षक राजेंद्र जाधव,वीश्वास साबळे,उषा पालखे,उमेश मार्कंडे,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ एन के भुजंग, डॉ विकास साटोटे, पोलिस पाटील गोपाल वैद्य,गुडे अदी उपस्थित होते.

मागील वर्षी हि कपाशीच्या काढणीच्या दिवसातच नांदर परिसरात बीबट्याच्याने दहशत निर्माण केली होती व प्राण्यांवरही प्राणघातक हल्ला केला होता.
यामुळे प्रशासणाच्या वतीने पोलिस पाटील गोपाल वैद्य यांनी गावातील परिसरात बिबट्या आसल्याची दवंडी दिली असून,प्रत्येकाने शेतात आपापली काळजी घ्यावी अशी दवंडी गावात देण्यात आली आहे.व श्री रेणुका देवीच्या मंदीरातील लाऊडस्पिकर मधुनही बिबट्याची माहिती देण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments