सावखेडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या,अतिवृष्टीचा परिणाम


सिल्लोड-
भराडी येथून जवळच असलेल्या सावखेडा बु.येथील  शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्का दायक प्रकार घडला आहे.

सावखेडा बुद्रुक येथे सुरेश रावसाहेब जंजाळ वय ३९( मूळ गाव वाकी ता. कन्नड) या शेतकऱ्याने गट क्र.१८८ मधील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.जंजाळ वाकी येथील रहिवासी असुन त्याच्या कडे  वाकी येथे फक्त 44 गुंठेच जमीन आहेत. तेथेही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने तो हतबल असल्याचे सांगण्यात आले. तिन वर्षांपासून सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे दुसऱ्याची 5 ते सहा एकर शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मका, कापूस पीक होते परंतु अतिवृष्टीमुळे हाती काहीच उत्पन्न येण्याची शक्यता नसल्याने त्यांनी बोरीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती प्राप्त झाली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शव विच्छेदन करण्यात आले.सिल्लोड ग्रामीणचे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे तपास करत आहेत.

Post a comment

0 Comments