शेलगाव खुर्द येथे सरपंच साहेबराव इधाटे व प्रशासक दीपक रणदिवे यांचा सत्कार
फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत याची मुदत संपल्याने आता ग्रामपंचायत स्थरावर प्रशासक पदाची नेमणूक करण्यात आली आहे.


ग्रामपंचायत स्थरावर प्रशासक म्हणून अभियंता,विस्तार अधिकारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापक अश्या वेगवेगळ्या स्थरावरील अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून सामावुन घेण्यात आले आहे.अश्याच फुलंब्री तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत च्या मुदती संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक ची नेमणूक करण्यात आली आहे.

अशाच शेलगाव खुर्द या ठिकाणी 13 सप्टेंबर 2015 ला ग्रामपंचायत निवडणुका होऊन सरपंच साहेबराव इधाटे उपसरपंच लक्ष्मीबाई इधाटे, सदस्य सोमिनाथ इधाटे, कमलाबाई गाडेकर,गयाबाई धनेधर,सुलोचनाबाई इधाटे, चंद्रकांत सनानसे हे निवडणून आलेले होते,सदरील पद आधिकारी याना पाच वर्षे पूर्ण झालीं व कोरोना परिस्थिती चा अभाव लक्षात घेता होणाऱ्या निवडणूक पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक म्हणून दीपक रणदिवे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.अश्याच फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द या ठिकाणी आज ग्रामपंचायत पद आधिकारी व प्रशासक आणि ग्रामसेवक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी दीपक रणदिवे,साहेबराव इधाटे, लक्ष्मीबाई इधाटे, नथ्थू इधाटे, कमलबाई  गाडेकर,गयाबाई धनेधर, सोमिनाथ इधाटे,  आजीनाथ तुपे,दत्तू तुपे,भगवंता इधाटे,शाईनाथ इधाटे, चंद्रकांत इधाटे, जनार्धन इधाटे, गौतम धनेधर, सुरेश फुके,हरिदास तुपे,सोमिनाथ फुके,किसन इधाटे,कैलास बिडवे,मधुकर साळवे,अनिल धनेधर, सुरेश माळी, कैलास पुरी,महादू इधाटे, रामेश्वर इधाटे, सुखदेव इधाटे आदी गावकरी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments