पैठण येथे माझे कुटुंब,माझी जबाबदारी उपक्रमासाठी प्रशासन उतरले रस्त्यावरपैठण ( विजय खडसन)--

 माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने यशस्वी राबविण्यासाठी पैठण प्रशासन आज रस्त्यावर उतरलेले दिसले. कोरोना या आजाराला हरवायचे असेल तर काही नियम पाळून आपल्याला कोरोना विषाणू सोबतच जगावे लागेल असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री श्री स्वप्नील मोरे यांनी केले आहे. कोरोना विषयक *15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर* दरम्यान विशेष जनजागृती अभियान  तालुका प्रशासन ,नगरपरिषद , पंचायत समिती व पोलीस प्रशासन विभागामार्फत राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत आज पैठण बस स्थानकावर, बस प्रवाशी व बस कर्मचारी यांना सोबत घेऊन  कोरोना विषयक जनजागृती प्रतिज्ञा घेण्यात आली. 
संत एकनाथ गॅस एजन्सी या ठिकाणीदेखील गॅस सिलेंडर टाकीवर कोरोना जनजागृतीचे माहिती पत्रक चिकटवण्यात आले. 
तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान अंतर्गत  उपस्थितांना कोरोनाच्या बाबत जनजागृती विषयी प्रतिज्ञा देण्यात आली. 
आजच्या संपूर्ण जनजागृती अभियानामध्ये स्वतः उपविभागीय अधिकारी श्री स्वप्नील मोरे, तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके, नगराध्यक्ष सुरज लोळगे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक श्री.भगिरथ देशमुख व सहाय्यक गट विकास अधिकारी श्री के.एम बागुल पैठणचे नगरसेवक,बंजरग लिबोरे,जितु परदेशी, नगरसेवक कल्याण भुकेले,विशाल पोहेकर, उपस्थित होते. 
यावेळी नायब तहसीलदार श्री डी.बी निलावाड, जनार्धन दराडे, दयानंद लक्षशेटे, संतोष अनार्थे, सतीश घावट अविनाश जाधव इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Post a comment

0 Comments