पैठण तहसील कार्यालयावर रा. कॉ.पार्टीचे निदर्शन केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीचे निवेदन


पैठण ( विजय खडसन)- पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने शेतकऱ्याना कांद्यावरील निर्यात बंदी घातली असून ती बंदी तात्काळ उठवावी केंद्र सरकारने कांद्यावर केलेली निर्यातबंदी उठवावी कांदाला आणि इतर शेतीमालाला योग्य भाव द्यावा मागण्यांबाबत शेतक-यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे  यांच्या नेतूत्वाखाली पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके  यांना निवेदन दिले यात असे म्हंटले आहे की केंद्राने कांदा निर्यात धोरणात बदल करीत निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव कोसळले त्यामुळे कधीचं हतबल कांदा उत्पादक शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे आता मिळणा-या भावापासुन कांद्याचा उत्पादनं खर्चही पदरात पडण्याची शास्वती नसल्याने शेतक-यांचे म्हणने आहे मागिल पाच - सहा महिन्यांत कोरोनाच्यां आजारांनी  शेतकरी फार मोठंया
  आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले असुन आता पुन्हा नविन समस्या समोर उभी राहीली आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी असे दत्ता गोडे यांनी व शेतक-यांनी   पैठणच्या  तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या विरोधात भव्य निदर्शने करून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, संत एकनाथ कारखान्याचे व्हा. चेअरमन गोपिकीसन गोर्डे, युवा जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, आप्पा गायकवाड, भाऊसाहेब पिसे, विठ्ठल छबिलवाड, दत्ता मोरे, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments