दौंड तालुक्यातील वाळू माफियांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.....


(निलेश जांबले )

 दौंड-पुणे...

रावणगाव येथील मंडळ अधिकारी व मलठण वाटलुज सह नदीपटृयातील वाळू माफियांना मदत करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ नुसार कारवाई करण्याची येथील स्थानिक नागरिकांमधुन मागणी केली जात आहे..... याबाबत तहसीलदार संजय पाटील यांनी लवकरच तसा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे मराठा तेज न्युज च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले...
दिवसेंदिवस वाळूमाफिया आपले गुन्हेगारी प्रस्थ वाढवून दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात खुलेआम वाळू उपसा करत असून हे वाळू माफिया प्रशासनास खुलेआम आव्हान देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याबाबत मराठा तेज न्युजने यापूर्वीही वृत्त प्रसारित केले होते... मात्र या बे-लगाम वाळू माफियांना महसूल कर्मचाऱ्यांचीच साथ असल्यानेच कोणतेही कृत्य करण्यास हे माफिया मागेपुढे पाहत नाहीत.... मागील आठवड्यात दौंड तालुक्यातील पूर्व भागातील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये वन अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी गेले असता त्यांच्यावरती वाळूमाफियांनी हल्ला करत जप्त करण्यात आलेल्या फायबर बोटी सह यंत्रणा पळवून नेली  होती , यावरून असे दिसते की एकीकडे वनविभागाचे अधिकारी जीवाची पर्वा न करता अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत,मात्र महसूल विभागाचे अधिकारी अशा माफियांना पाठीशी घालत असतानाही वरिष्ठ कोणतीही कारवाई करत नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे...याप्रश्‍नी दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता  वरिष्ठ कार्यालयाकडे अशा अधिकाऱ्यांवर कर्मचार्यांवर  कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले, तसेच यापूर्वी ही नोटीस दिली असून लवकरच आणखी नोटीस देण्यात येईल असेही सांगण्यात आले...

Post a comment

0 Comments