माँसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजलीभावभक्ती गीतांनी माँसाहेब यांच्या आठवणींना उजाळाऔरंगाबाद -  तमाम शिवसैनिकांच्या माँ साहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने बाळकृष्ण महाराज मंदिर परिसरात भावभक्ती गीतांनी माँसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. अलाप प्रस्तुत कार्यक्रम सोशल डिस्टस्टिंगचे पालन करून पार पडला.
    याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख तथा आमदार प्रदिप जैस्वाल, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव  राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, अनिल पोलकर, आंनद तांदुळवाडीकर संतोष जेजुरकर, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाल कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ‍विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, महिला आघाडी संपर्कसंघटक कला ओझा, सहसंपर्कसंघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक सुनिता देव, उपजिल्हा संघटक प्रतिभा जगताप, नलीनी बाहेती, अनिता मंत्री, अंजली मांडवकर, शहरसंघटक आशा दातार, प्राजक्ता राजपूत विद्या अग्निहोत्री, विधानसभा संघटक मिरा देशपांडे, 
उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, हिरालाल सलामपुरे, जयसिंग होलीये, मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, बाळू गडवे, चंद्रकांत इंगळे, संदेश कवडे, युवासेना कॉलेज कक्षप्रमुख  ऋषिकेश जैस्वाल, माजी नगरसेवक बन्सी जाधव, सीताराम सुरे, किशोर नागरे, सचिन खैरे, मनोज बल्लाळ, गजानन मनगटे, सतीश कटकटे, गिरीजाराम हाळनोर, कमलाकर जगताप, व्यापारी आघाडी उपजिल्हाप्रमुख विजय सूर्यवंशी, बंटी जैस्वाल, पुनमसिंग राजपूत, राजू गरड, संदीप हिरे, संदीप सपकाळ, चंद्रकांत देवराज, सुधीर घाडगे, कृष्णा भोसले, संतोष जाटवे, ऍड. राजू पहाडिया, रवी कदम, शिवाजी अपरे, गणेश अंबिलवादे, महिला आघाडीच्या सीमा गवळी, सुचिता आंबेकर, पद्मा तुपे, सुषमा यादगिरे, सुनीता महाजन, मीरा पाटील, रुख्मिनी पवार, राजश्री राणा, शीतल जाटवे, सोनल जैस्वाल, कविता सुरळे, प्रियंका जैस्वाल, विजया त्रिभुवन, राखी सुरडकर, जयश्री इंदापुरे यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments