पैठण येथे सकल मराठा समाजाने केले बोंबाबोंब आंदोलन
पैठण ( विजय खडसन):--  मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकार विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी चौक परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय कुठलीही सरकारी नोकर भरती करू नये. आरक्षणाचा पेच राज्य व केंद्र सरकारने त्वरित सोडवावा आदी मागण्यांसाठी पैठण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज २१ सप्टेंबर रोजी शिवाजी चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. 

या प्रसंगी सकल मराठा समाजाचे नेते दत्ता भाऊ गोर्डे, विलास बाप्पू भुमरे, आतिष गायकवाड, कल्याण भुकेले, संजय मोरे, किशोर सदावर्ते, शहादेव लोहार, संतोष सव्वाशे, बाळासाहेब माने, कृष्णा मापारी, संजय कोरडे, दत्तात्रय जाधव, सोनू शिंदे, तुषार पाटील,गणेश पवार, अनिल राऊत, रामेश्वर बावणे,  आप्पा गिरगे, अमोल भागवत, सुरज गोजरे आदि मराठा समाजाचे नेते व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments