वाघ्या मुरळी चे गगापूर तहसीलदारांना विविध मागण्यांसाठी निवेदन,


गगापुर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 

वाघ्या मुरळी कलेच्या माध्यमातून धर्म जागरण, कुळधर्म ,कुळाचार, पालन याव्दारे समाज प्रबोधन  समाजसेवेचे कार्य करत आहे समाजातील भाविक भक्तांच्या सूर्यावर आमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत असतो मागील वर्षी अतिवृष्टी त्यानंतर निवडणुक आचारसंहिता त्यामुळे  कलावंतांना उत्पन्न मिळू शकले नाही  मार्च पासून चालू असलेल्या कोरोना लॉक डाऊन मुळे जागरण गोंधळ कार्यक्रम होऊ न शकल्याने आमचे कुटुंब आर्थिक संकटात सापडून उपासमारीची वेळ आली आहे यासह विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ करून वाघ्या मुरळी परिषदचे गंगापुर तालुका अध्यक्ष अनिल दुधे, सपना ताई ,बापू पाचपुते ,कैलास जाधव ,अशोक सुखदान, भाग्यश्री दुधे, ऋषिकेश दुधे, संतोष बनकर, अलकाताई , यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे
वाघ्या मुरळी परिषदेच्या मागण्या या आहे कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा कलावंताच्या मुला मुलींच्या शिक्षणात शिक्षणाचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात यावा लोककलेस शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळवून देण्यात नोंदणी करण्यात यावी लोक कलावंताचया निवासासाठी शासनाकडून जमीन, घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी कलावंतांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी महाराष्ट्रातील लोक कलावंतासाठी  स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे नियमाचे पालन करून लोककलावंतांना कुळाचारांचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी तसेच देवालये, मंदीरे, राऊळे खुली करावी

Post a comment

0 Comments