माणगाव येथे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने विविध मागण्या करीता ठिय्या आंदोलन


 रायगड, माणगाव
माणगाव येथे शुक्रवार दि. २५ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्या स्थगिती च्या विरोधात, महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात येणाऱ्या पोलीस भरती ची प्रक्रिया मराठा आरक्षणाचा निर्णय येणेपर्यंत थांबवण्यासाठी व तांबडी प्रकरणातील आरोपींना शिक्षा लवकरात लवकर होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्या करिता तसेच विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शंकर पवार, श्री राजू मोरे, गजानन अधिकारी, सुरेश वाघ,प्रमोद घोसाळकर, श्री बिरादर सर, श्री लक्ष्मण महालूंगे, देवेंद्र गायकवाड, अॅड.सायली दळवी.नरेंद्र जाधव.संजोग मानकर, सिकंदर आंबोणकर, अविनाश सावंत व ईतर मान्यवर तसेच सकल मराठा चे अनेक कार्यकर्ते बहुसंख्याने हजर होते, "एक मराठा लाख मराठा" च्या घोषणा देऊन तहसीलदार माणगाव यांना निवेदन देऊन मोर्चा संपन्न करण्यात आला. 
प्रतिनिधी: रिजवान मुकादम
मराठा तेज, माणगाव, रायगड

Post a comment

0 Comments