गंगापूर ( प्रतिनिधी
प्रकाश सातपुते )
लासुर स्टेशन येथून जवळ असणाऱ्या लासुर ते पोटूळ रेल्वे स्टेशन दरम्यान एका 60 ते 65 वय असलेल्या अनोळखी असणाऱ्या व्यक्तीने
12715 नांदेड/अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली असून याठिकाणी तात्काळ शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले यावेळी रेल्वे सेना सदस्य,रेल्वे पोलीस हेही घटना स्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला असून सदर इसमाची ओळख पटली नसल्याने फिंगर प्रिंट तज्ज्ञांना ओळख पटण्यासाठी आत्महत्या केलेल्या इसमाचे हाताची व पायाची तुटलेली बोटे जमा केली असून पुढील तपास पोलीस करणार आहेत. यावेळी घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पीआय रवींद्र खांडेकर रेल्वे पोलीस दिलीप कांबळे आधी पोलिसांनी पाहणी केली
0 Comments