जरंडीचे कोविड केंद्र निम्मे भरले...रुग्णसंख्या २५ वर             
          सोयगाव ,दि.२५   .(प्रतिनिधी)जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्र निम्म्याने भरले असून गुरुवारी(ता.२४)तीन रुग्ण दाखल झाल्याने रुग्णसंख्या २५ वर गेली आहे.तालुक्यात संसर्ग वाढल्याने कोविड केंद्राची संख्याही वाढत आहे.

           सोयगाव तालुक्यासाठी आशावादी ठरलेले नैसर्गिक सान्निध्यातील जरंडीचे कोविड केंद्र निम्म्यावर आले असून ५० खाटांची क्षमता असलेल्या या कोविड केंद्रातून १५० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ.आनंद भाले यांनी दिली आहे.

         पुरेसा औषधसाठा उपचाराची व्यवस्था आणि धडपडणारे वैद्यकीय पथक यामुळे या केंद्रातून १५० रुग्णांना कोरोनामुक्त होण्याची संधी मिळाली असलायचे घरी परतलेल्या रुग्णांनी सकाळशी बोलतांना सांगितले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांचेसह चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या धडपडीमुळे या कोविड केंद्राला यश प्राप्त झाले आहे.जिल्ह्यात जरंडी कोविड केंद्राचा रुग्ण सुधारणेचा दर वाढता झालेला आहे.आरोग्य कर्मचारी अतुल नवले,सुप्रिया मेश्राम,प्रिया रावूत,वैभव कंकाळ,प्रतिक नवगिरे,वर्षा शेळके,अलका नवगिरे आदींचे पथक रुग्णांवर उपचार करत आहे.

Post a comment

0 Comments