मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाल्याने जखमी झालेल्या तपन पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

धुळे : प्रख्यात उद्योगपती आणि धुळ्यातील नगरसेवक तपन पटेल यांचा अपघाती मृत्यू झाला. मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाल्याने जखमी झालेल्या पटेल यांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. 
तपन मुकेशभाई पटेल धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे नगरसेवक होते. पटेल बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी येत होते. सावळदे (ता.शिरपूर) येथील NMIMS कॅम्पसमधून येताना महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कारच्या इंजिनचा स्फोट झाला. अपघातात त्यांच्या गाडीचाही चक्काचूर झाला.
तपन पटेल कार अपघातात गंभीर जखमी झाले होते. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.


Post a comment

0 Comments