आधी मराठा आरक्षण द्या... मगच पोलीस भरती करा संभाजी ब्रिगेडचा पोलीस भरतीला विरोधपंढरपूर/गणेश गांडुळे

संभाजी ब्रिगेड,पंढरपूर शहर,महाराष्ट्रच्या वतीने निवेदन करतो की,महाराष्ट्रातील बहुसंख्य आणि मुख्य समाज असणार्‍या मराठा आरक्षणाला मा.सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेली आहे.तसेच सदर प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. अशा परिस्थितीमध्ये दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.सदर निर्णयाचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्यावतीने सर्वप्रथम जाहिर निषेध करतो.

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा प्रश्न असणारे मराठा आरक्षण सध्या मा.सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे न्यायप्रविष्ठ आहे.अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई भरतीसाठी सुमारे १२,५३८ इतकी पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.सदरचा हा निर्णय मराठा समाजावर सरळ सरळ अन्याय करणारा आणि आधीच मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे चिडलेल्या मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.मराठा आरक्षणाला स्थगिती असताना अशा प्रकारची पोलीस भरती काढणे म्हणजे मराठा समाजाचा आणि मराठा तरुणांचा नोकरीचा हक्क सरळ सरळ जाणिवपुर्वक डावलण्यासारखे आहे.आपल्या शासनाचा सदर निर्णय मराठा समाजाचा भावना तिव्र करणारा आणि मराठा समाजाला जाणिवपुर्वक डिवचण्याचा प्रयत्न आहे.असा आमचा आपल्या महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप आहे.

या निमित्ताने आम्ही आपणास सुचित करु इच्छितो की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तो पर्यंत महाराष्ट्र शासनाच्यावतीने जाहिर करण्यात आलेली संभाव्य पोलीस शिपाई भरती स्थगित करण्यात यावी.तसेच जो पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय लागत नाही तो पर्यंत महाराष्ट्रातील शासनाच्या कुठल्याही विभागातील कोणत्याही स्वरुपाची नोकर भरती करण्यात येऊ नये.या उपर आपल्या महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पोलीस भरतीचा सदर निर्णयची अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या विरोधात राज्यभर तिव्र आंदोलन छेडू व तद्नंतर निर्माण होणार्‍या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास आपले महाविकास आघाडी सरकार पुर्णत: जबाबदार राहिल.याची नोंद घ्यावी.हि नम्र विनंती.

या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहराध्यक्ष लखनराज थिटे,उपाध्यक्ष शनि घुले,सचिव प्रज्वल नागटिळक,संघटक राकेश साळुंखे,विशाल पवार,राहुल बोरकर,पंकज पवार,जयदिप माने,रोहित फावडे,बापू लटके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Post a comment

0 Comments