मंगळवेढ्यात शेतकऱ्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न;'स्वाभिमानी' बँक अधिकाऱ्यांच्या तोडालाच फासले काळे


मंगळवेढा . राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या कारणावरून शेतकय्रांने निष्काळजी अधिकाऱ्यावर शाई फेक करत  पंचायत समितीच्या सभागृहात बँक अधिकाऱ्याच्या बी.एल.बी.सी बैठकीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
    तालुक्यामध्ये  बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र,भारतीय स्टेट बँक,  आय .सी.आय.सी. बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक,  या बँकेचे शाखा असून  यंदा पाऊस समाधानकारक पडून शेतात पिके चांगली असताना बँक अधिकाऱ्याकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या परंतु याकडे बँक अधिकारी व जिल्हा प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप देण्यात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत कोरानाच्या संकटांमध्ये शेतकऱ्यांना बँकेत येवून होणारा त्रास वाचावा म्हणून शासनाने सोलापूर जिल्हाधिकारी च्या संकेतस्थळावर ऑनलाईन पीक कर्ज मागणीचा अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या परंतु ऑनलाईन अर्ज केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पीक कर्जाचे वाटप झाले नसल्यामुळे व याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंचायत समितीच्या सभागृहात सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या बी.एल.बी.सी. बैठकीत मध्ये घुसून शाई फेक व तोंडाला काळे फासले. सर्वाधिक तक्रारी नदीकाठच्या भागात असलेल्या आरळी व माचणूर  येथील आयसीसी बँकेबद्दल आहेत. त्या बँकेच्या अधिकाऱ्यावर शाई फेक करण्यात आली. शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एकंदरीत कोरोनाच्या संकटात बँक अधिकाऱ्याच्या मुजोर व एकाधिकारशाही कारभाराकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसून आले

Post a comment

0 Comments