राज साहेबांचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करु- संदीप देशपांडे

ठाणे : आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय” असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला .
सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी कर्जत पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कलम १०७ अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी आज कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात हजर झाले. यावेळी संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. 
सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोलचे आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज तीच गोष्ट हाय कोर्टाने म्हटली आहे.

Post a comment

0 Comments