राज्य महामार्गावरील पूल खचला,कोणत्याही प्रकारचा अपघात नाहीएका बाजूला धरण एका बाजूला ओढा मोठ्या अपघातास निमंत्रण

औरंगाबाद - नाशिक राज्यमार्गावरील शिऊर बंगला- गारज मधील रस्त्यालगत असलेल्या शेरीच्या  धरणालगत असलेला पूल खचला आहे, सुदैवाने अपघात न झाल्याने मोठा अनर्थ टळला . 
 या राज्यमार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते शिवाय चाळीसगाव वरून औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक याच मार्गावरून वळविण्यात आली असल्याने याच रस्त्यावर वाहतूकीचा लोड वाढला . 
या रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांनी करून देखील गेंड्याची कातडी पांघरलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे डोळेझाक केली. 
शिवाय शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि सत्यजित ताईतवाले यांनी या बाबत पत्रव्यवहार देखील केला मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. 
रस्तावरील पूल खचल्याची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली दरम्यान वाहतूक खोळंबली असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत केली.

एका बाजूला शेरीचे धरण अगदीच लगत असून या रोडच्या दोन्ही बाजूला पाणीच पाणी आहे. या खड्याचा अंदाज येत नसल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे अपघात घडले आहेत.

गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका टेम्पो चालकाला या गड्याचा अंदाज न आल्यामुळे हा टेम्पो या गड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ओढ्यात पलटी झाला  सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही ....


औरंगाबाद ते शिऊर बंगला हा  राज्य महामार्ग आता काही दिवसापूर्वी राष्ट्रीय  महामार्गत हस्तांतरित झाल्यामुळे या रोडवर असलेल्या या महाभयंकर अपघात स्थळाकडे  आता राज्य महामार्गाचे  अधीकारीही आता बिनधास्तपणे या रोडचा व आमचा काहीही संबंध नाही असे स्पष्टपणे सांगत आहेत.

  

मोठ्या जिवीतहानीची शक्यता नाकारताच येणार नाही :- 

 कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्या तिन महिन्यापासून बंद होत्या परंतु आता एसटी महामंडळाच्या सर्व बसेस आता सुरू झाल्यामुळे  या रोडवर   बर्यापैकी बससेवा चालू झालेली आहे बसचालकांना या  रोडवर असलेल्या न दिसणार्या  खड्यांचा अंदाज येत नसल्याने बसेस रोडच्या खाली उतरत आहोत तर   या  ठिकाणी एका बाजूला धरण तर बाजूला मोठा ओढा  आहे  यामुळे येथे मोठ्या अपघाताचीजिवीतहानीची शक्यता  नाकारता येणार नाही


औरंगाबाद  नाशिक  मालेगाव वाहतूक  बंद :- 

औरंगाबाद नाशिक - मालेगाव रोडवर असेलला या  महाभयानक  पुल अत्यंत जिर्ण व कमकुवत पुलावर येथे भलामोठा न दिसणारा खड्डा तयार झाला होता आज दुपारी तिन वाजता खचल्यामुळे  या रोडवरील औरंगाबाद वैजापूर नाशिक मालेगाव वाहतूक आता पाणपोई फाटा  गारज ते पोखरी ते शिऊर बंगला मार्गाने वळवण्यात आली.

  वेळोवेळी यासाठी लेखी व तोंडी स्वरूपात संबंधित विभागास पत्रव्यवहार केला परंतु संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्याने आज ही घटना घडली असल्याने शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले ....दरम्यान  वेळोवेळी या पुलाविषयी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना या बद्दल माहिती देऊनही संबंधित असलेल्या अधिकार्यांनी याची दखल घेतली नाही व साईटवर येण्यासाठी वाहणे उपलब्ध नाही असे सांगत वेळ काढून घेत असे परंतु आज हा पुल खचताच एक तासातच  या ठिकाणी हजर झाले.

या रोडवरील वाहत बंद असून दोन तिन दिवसात या ठिकाणी नळकांडी पुल बनवून तातपुर्ती व्यवस्था करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्रिमती  व्हि एन कोतवाल यांनी सांगितले.

मराठा तेज न्युज साठी
राहुल त्रिभुवन
प्रतिनिधी वैजापूर

Post a comment

0 Comments