सकल धनगर समाजाचे खंडाळा येथे ढोल बजाओ आंदोलन


वैजापूर( प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन ) : 

वैजापूर तालुक्यातील खंडाळा  येथे शुक्रवारी सकाळी पद्मश्री डॉक्टर खासदार विकास महात्मे  व समाज भूषण धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाज संघर्ष समितीचे औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव  यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा गावातील  सकल धनगर समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय समोर धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी व  सरकारने धनगर समाजासाठी    दिलेल्या एक हजार कोटी रुपयांची वितरण त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी खंडाळा ग्रामपंचायत कार्यालय समोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

 यावेळी खंडाळा ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी राहिंज, वैजापूर पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक रमेश जाधवर, खंडाळा गावचे पोलीस पाटील नितीन बागुल यांना निवेदन देण्यात आले.

 यावेळी उद्योजक ग्रामपंचायत गटनेते संजय  जेजुरकर, ग्रामपंचायत सदस्य विजू नाना मगर, भीम बागुल, नारायण पवार  शिक्षक मनोज सोनवणे, पत्रकार  ताराचंद वैंळजकर, माजी उपसरपंच साजिद भाई, प्रतिष्ठित व्यापारी भागवत घोडेकर,सामजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव, पत्रकार शेख,सुधीर बागुल, गणेश थोरात, गणेश ढगे , सुनील घनवट , रवींद्र ढगे ,भाऊलाल ढगे, सुभाष जानराव, चंद्रकांत जानराव ,सतीश कवार, अशोक गायकवाड, भाऊसाहेब जानराव, कारभारी बडे, सुखदेव जानराव, बाबासाहेब जानराव, तुळशीराम जानराव, सोमनाथ जानराव,  भाऊलाल जानराव, सोनू जानराव, दत्तू जानराव, विक्रम जानराव, अमोल कवार, रंजीत गायकवाड,शिक्षक निलेश ढगे  शंकर कवार,प्रवीण ढगे,तुकाराम ढगे, कैलास ढगे, संतोष जानराव, संजय जानराव, राजू जानराव, राहूल ढगे, गणेश कवार, विजय पवार, मच्छिंद्र कवार,  विजय ढगे, नामदेव ढगे, विठ्ठल जानराव, शिवनाथ पवार, कैलास आगवन, अमोल ढगे, संजय ढगे, समाधान गोराणे, शामराव  खोचे,  सौरभ जानराव, तेजस ढगे आदींची यावेळी खूप मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments