दरेगाव येथे व्यसनमुक्ती शिबिर संपन्न.खुलताबाद -
दरेगाव येथे दिनांक 20 सप्टेंबर 2020 रविवार रोजी सकाळी 9 वाजता 
सारा फाऊंडेशन संचलित.
"दारुमुक्त घर -दारुमुक्त गाव या अभियाना अंतर्गत दारू सोडवण्यासाठी  औषध उपचार आणि समुपदेशन अभियान शिबीर ग्रामपंचायत कार्यालय  दरेगाव  च्या सरपंच श्रीमती जयश्री गणेश बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या शिबिरात पहिल्या दोन  दिवसात  दारू ने तळमळणाऱ्या परिवाराला सुखाचे क्षण देणारे हे शिबिर होते. या आधी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दारूच्या  व्यसनाने तळमळणाऱ्या 26 हजार पेक्षा जास्त कुटूंबासोबत व्यसनमुक्तीचे कार्य या सामाजिक अभियानाने केले आहे.                            "सारा  फाऊडेंशन  औरंगाबादचे संचालक डॉ. कृष्णा भावले सर यांनी 12 वर्ष अभ्यास करून, कोणताही त्रास न होता दारूचे व्यसन सहज सोडता येऊ शकते हे महाराष्ट्र व गुजरात या राज्यातील अनेक व्यसनी लोकांना दारूच्या व्यसनापासून  कायमचे दुर करून सिद्ध केले आहे,  हे अभियान  व्यसनमुक्तीसाठी एक सामाजिक चळवळ आहे.या अभियानातून व्यसनामुळे तळमळणारा एका परिवाराचा मोडून पडलेला आधारस्तंभ  उभं करण्याचा प्रयत्न आहे.
 एक सामाजिक जबाबदारी म्हणून दरेगाव व परिसरातील गावातील  ज्या लोकांना दारूचे व्यसन जडले आहे अशा लोकांना दारूचे व्यसन सोडण्याकरिता "व्यसनमुक्ती शिबिराचे " आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यँत सुरु होते. या शिबिरात दरेगाव, पाडळी, सोबलगाव,माळेगाव, भोकणगाव,भारंबा तांडा, डोंगरगाव, शेरोडी, उपळी,या गावांसोबतच कन्नड व खुलताबाद शहरातील लोकांनी सहभाग नोंदवला. आपणच आपला संसार सुखाचा करू शकतो, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू शकतो, आपल्या पत्नीचे कुंकू वाचवू शकतो, गावात प्रतिष्ठेने वागू शकतो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या म्हणीप्रमाणे  या शिबिरात 80 व्यक्तींनी स्वतः दारूचे व्यसन सोडण्यासाठी उपचार करण्यासाठी सहमती दर्शवून औषधी घेतली.
शेवटी आपल्यामुळे कुणाचा संसार सुखाचा होत असेल, तर याच्यासारख्या दुसरा आनंद शोधून मिळणार नाही, या सामाजिक भावनेतून या शिबिराच्या आयोजनासाठी कल्पतरु  बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव या संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
या शिबीराचे सूत्रसंचालन श्री शिवाजी गायकवाड यांनी केले तर हे शिबिर यशस्वी होण्याकरिता दरेगाव चे पोलीस पाटील श्री कांताराम बनकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री छगन गायकवाड श्री गणेश बोर्डे,  काकासाहेब गायकवाड, अशोक गायकवाड, गोकुळ ग्रॅण्डवाल, बाबासाहेब गायकवाड, कृष्णा गायकवाड,गणेश गायकवाड,अंकुश गायकवाड, राहुल दापके, काकासाहेब खुटे, रामेश्वर गायकवाड, जनार्धन गायकवाड यांनी मेहनत घेतली.

Post a comment

0 Comments