मराठा आरक्षण प्रश्नी अखिल भारतीय मराठा महासंघाची तालुकास्तरीय बैठक संपन्नपैठण ( विजय खडसन ):-

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक दि. १७  सप्टेंबर रोजी शिवेक्ष्वर मंगल कार्यालयात  संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती राज्यशासनाने पुनर्विचार याचिका दाखल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निकाल येईपर्यंत  नोकरी व शिक्षण क्षेत्रात या आधी लागू असलेल्या सवलती अटी व शर्तीसह चालू ठेवाव्यात. शासकीय नोकर भरती थांबवावी यासाठी येत्या २१  सप्टेंबर रोजी पैठण येथे बोंबाबोंब आंदोलन पुकारणार असल्याची माहिती अतिष गायकवाड यांनी दिली या वेळी जय जिजाऊ जय शिवराय ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अश्या घोषणा देण्यात आल्या या बैठकीस तालुक्यातील युवकांची मोठ्या पृमाणात उपस्थिती होती व तसेच केंद्रीय मंत्री ना रावसाहेब दानवे व राज्यमंत्री ना संदीपानजी भुमरे साहेबाना भेटून निवेदन देणार असल्याचे निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Post a comment

0 Comments