एक फोन लावला अन् ८ लुटारू अडकले खेड पोलिसांच्या जाळ्यात ; स्वस्ता सोन्याचे आमिष दाखवून ५९ लाख रुपये लुटले


 रत्नगिरी, खेड :     २ किलो सोने ६० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून ५९ लाख रुपयांची रोकड लुटणाºया ८ लुटारूंना खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर लुटमारीचा मुख्य आरोपीसह ४ जणांचा पोलीस शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर नावाच्या एका इसमाने २ किलो सोने ६० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून अनेकांना हाती धरले. कारोडे रुपयांचे सोने स्वस्त दरात मिळत असल्याने ५ ते ६ जण सोने खरेदीसाठी तयार झाले. ठरल्यानुसार १६ सप्टेंबर रोजी  ५९ लाख रुपये घेऊ न खरेदीदार म्हसळा परिससरात आले. जंगल परिसरात आधीपासून किशोरच्या इतर साथीदार लुटमारीच्या तयारीत दबा धरून बसले होते. खरेदीदार तेथे येताच त्यांच्यावर १२ जणांच्या टोळक्याने हल्लाबोल केला. त्यांना जबर मारहाण करून पैशांनी भरलेली बॅग खेचून लुटारू दुचाकीवरून सुसाट निघून गेले. 
   दरम्यान, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये तपास करीत असताना त्यांना शास्त्रीय व तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली की गुन्ह्यातील काही आरोपी म्हसळा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर पथक तात्काळ म्हसळा येथे रवाना झाले.  म्हसळा परिसरात शोध घेतल्यानंतर आरोपींचा काहीही थांगपत्ता लागेना त्यामुळे गोपनीय माहिती काढल्यानंतर असे समजले की आरोपी यांचा मोबाईलचा रिचार्ज संपला आहे त्यामुळे तो कोणाशी संपर्क साधू शकत नाही.
    पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी  तात्काळ  सदर आरोपी याच्या मोबाईलवर पन्नास रुपयाचा रिचार्ज मारला. रिचार्ज मारल्यानंतर  काही वेळातच  आरोपी याचा  त्याच्या भावाशी संपर्क झाला  त्यामुळे  समजले की  आरोपि हे म्हसळ्याच्या जंगल परिसरात लपून बसलेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी जंगल परिसरात सापळा रचला व जंगलात लपून बसलेले विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार, नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार, मनोज रमेश जाधव यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये, एक कार,  पाच मोटरसायकल व आठ मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत
    सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक खेड श्रीमती सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बांगर, पोलीस हवालदार विजय खामकर, पोलीस हवलदार शिवराज दिवाळे, पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई अजय कडू, पोलीस शिपाई रुपेश जोगी व पोलीस शिपाई साजिद नदाफ आदी पथकाने केली.

Post a comment

0 Comments