सोयगावला तीन लाखाची डीझेल चोरी.....पेट्रोलपंप फोडला

...

सोयगाव,दि.९(प्रतिनिधी) : -
सोयगाव शहरातील फर्दापूर रस्त्यावरील ओम साई पेट्रोल पंपाच्या साठवण टाकीचे कुलूप तोडून मंगळवारी मध्यरात्री दहा ते बारा अज्ञातांनी तीन लाख २२ हजार रु चे ४०६७ लिटर डीझेल अज्ञातांनी चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली.या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
सोयगाव शहराला लागून असलेल्या फर्दापूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील साठवण टाकीचे कुलूप तोडून दहा ते बारा अज्ञातांनी ४०६७ लिटर डीझेलची चोरी केल्याची फिर्याद पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सुरेश घन यांनी बुधवारी दिली आहया प्रकरणी सोयगाव पोलिसांनी बुधवारी घटनेचा पंचनामा केला असता त्यांना घटनास्थळावर तोडलेले कुलूप आणि काही संशयित साहित्य आढळून आले.फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या दहा ते बारा टोळक्यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,उपनिरीक्षक युवराज शिंदे,जमादार संतोष पाईकराव,दिलीप तडवी,संदीप चव्हाण,शिवदास गोपाळ,सागर गायकवाड,आदी तपास करत आहे.

Post a comment

0 Comments